बळीराजा
₹399.00
करपलेलं पीक ,तहानलेली जनावरे आणि चिंतातुर होऊन बसलेला माझा शेतकरी राजा.सध्या सगळीकडे असंच काहीसं चित्र पहायला मिळत आहे.या काव्यसंग्रहाचे संकलन करत असतांना आज संम्पूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईकडे लोटला जात आहे आणि याचा सर्वात जास्त फटका कुणाला बसत आहे तर तो म्हणजे शेतकऱ्याला’. खरंतर त्याच्या नशिबी न संपणाऱ्या असंख्य अडचणी आहेत कधी दुष्काळाचा घाला तर कधी अतिवृष्टीचा तडाखा,कधी बेमोसमी पाऊस तर कधी गारपीट, कधी शेतीमालाला मिळणारा कमी भाव तर कधी सरकारी योजनांचा न मिळणारा लाभ.हे सर्व कमी की सावकारी जाच आणि बँकांकडून घेतलेलं कर्ज कायमच त्याच्या मानगुटीवर बसलेले असतात. सगळीकडूनच नाडल्या गेल्यावर जगण्याची उसनी उम्मीद नेमकी त्याने आणायची कुठून .? राज्यात दरवर्षी कितीतरी शेतकरी बांधव या आसमानी आणि सुलतानी संकटामुळे आपली जीवनयात्रा संपवतात जी खूप भयावहक सत्य परिस्थिती आहे. एवढं सार होऊन सुद्धा तो दरवर्षी शेतात उभा असतो त्याच दमाने आणि एका नव्या उमेदीने फक्त याच आशेवर की निदान या वर्षी तरी काहीतरी चांगलं होईल. अशा नेहमीच जिद्दीने कष्ट करणाऱ्या आणि कितीतरी संकटाचा सामना करणाऱ्या माझ्या ह्या शेतकरी राजाच्या भावना कवीतेतून लोकापर्यंत पोहचवायचा एक छोटासा प्रयत्न मी आणि माझ्या सहलेखकांनी ‘बळीराजा’ या काव्यसंग्रहमधून केलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.